Sillod News : अधिकाऱ्याच्या टेबलावर सोडले विंचू! प्रमाणपत्रे देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने ‘धाडस’चे आंदोलन
Sillod Protest : आदिवासी जातीचे प्रमाणपत्र वेळेवर न मिळाल्याने संतप्त धाडस संघटनेच्या पदाधिकाऱ्याने उपविभागीय अधिकाऱ्याच्या टेबलावर जंगलातून आणलेले दहा विंचू सोडले. या वेगळ्या आंदोलनामुळे प्रशासन खडबडून जागं झालं आहे.
सिल्लोड : विविध मागण्यांसाठी शासकीय कार्यालयात रिकाम्या खुर्चीला हार घालतात, कुणी पाण्याच्या टाकीवर जातात, कुणी मुंडण करतात, तर कुणी तलावात उतरून आंदोलन करतात. याच्या बातम्या आपण नेहमी वाचतो.