
छत्रपती संभाजीनगर : गौरी पूजनासाठी फुले खरेदी करताना टीव्ही सेंटर चौकात हरवलेला मोबाइल काही दिवसांनी मोठ्या आर्थिक फसवणुकीचे कारण ठरला. सहा ते नऊ सप्टेंबर २०२४ दरम्यान सेवानिवृत्त वृद्धाच्या फोनपे अॅप वापर करून सायबर भामट्याने तब्बल एक लाख ४२ हजार रुपयांची रक्कम उडवली आहे.