छत्रपती संभाजीनगर - यंदा सर्वत्र चांगला पाऊस असला, तरी मराठवाड्याची अवर्षणप्रवण भाग म्हणूनही ओळख आहे. शेतकऱ्यांसाठी हवामानबदल परिणामी पिकांवर येणाऱ्या कीडरोगांचे प्रमाण, तर कधी शेतमालाला न मिळणारे अपेक्षित दर यामुळे शेतकरी चांगलाच पिचून जातो..परंतु, काही वर्षांपासून रेशीम शेतीतून विकास साधण्याचा अनोखा पॅटर्नच जणू मराठवाड्याने ‘सेट’ केल्याचे चित्र आहे. एकट्या बीड जिल्ह्यात ५० टक्के तुती लागवड असून, हा जिल्हा मराठवाड्यातच नव्हे, तर राज्यात लागवडीसह कोष उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे.एक डिसेंबर अखेर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ११ हजार ७० शेतकऱ्यांनी तुती लागवड केली असून, ते रेशीम शेती करतात. ११ हजार ५३१ एकरांवर तुतीलागवड करण्यात आली असून, मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजेच पाच हजार ७११ एकरावर तुती लागवड करण्यात आलेली आहे..का परवडते रेशीम शेती?एकदा लागवड केलेली तुतीची बाग जवळपास १५ वर्षांपर्यंत टिकते, त्यामुळे पुनर्लागवडीचा खर्च येत नाही. लागवड केल्यावर त्यापासून १५ वर्षे उत्पन्न घेता येते. तुती लागवडीपासून तीन ते चार महिन्यांतच तुती बाग संगोपन योग्य होते. त्यामुळे इतर पिके किंवा फळबागेच्या तुलनेत लागवडीपासून उत्पादन कमी कालावधीत सुरू होते. रेशीम कोषाला कमीत-कमी पाचशे रुपये प्रतिकिलोपासून भाव राहतो. कोषविक्रीसाठी बंगळूरला जावे लागत असे. आता जालना, बीड, पूर्णा (परभणी) आदी ठिकाणी कोष विक्री करता येतात..कोटींची उलाढालता. एक एप्रिल २०२४ ते ता. ३० नोव्हेंबरदरम्यान एकट्या बीड जिल्ह्यातील १० हजार ९१ शेतकऱ्यांनी ९३३ मेट्रिक टन कोषविक्री केली असून, त्यापासून त्यांना ४१ कोटी ७९ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती प्रादेशिक रेशीम अधिकारी महेंद्र ढवळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. याच कालावधीतील मराठवाड्यातील १२ हजार ७९२ इतकी शेतकऱ्यांची संख्या असून, एक हजार १८३ मेट्रिक टन कोषविक्रीतून शेतकऱ्यांना ५२ कोटी २४ लाख रुपयांचा नफा मिळाला आहे..हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून रेशीम शेतीकडे कल वाढला आहे. कमी पाण्यातही येणारे हे पीक आहे. तुती लागवडीमध्ये बीड जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.- महेंद्र ढवळे, प्रादेशिक रेशीम अधिकारी, छत्रपती संभाजीनगर.मी दोन एकरांत तुती लागवड केली आहे. मी ४५० अंडीपुंज आणले होते. कोषविक्रीतून मला दोन लाख ५४ हजारांचे उत्पन्न मिळाले. दरमहा हमखास पैसे देणारे हे पीक आहे.- सर्जेराव चव्हाण, शेतकरी, उदंड वडगाव, जि. बीड.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.