भांडण, वाद असतील, तर ते काढून टाका, रावसाहेब दानवेंचा भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP Meeting

भांडण, वाद असतील, तर ते काढून टाका आणि आगामी ग्रामपंचायतीपासून पुढील सर्व निवडणुकांसाठी कामाला लागा, असा कानमंत्र केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी (ता. १२) कार्यकर्त्यांना दिला.

भांडण, वाद असतील, तर ते काढून टाका, रावसाहेब दानवेंचा भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र

औरंगाबाद : भांडण, वाद असतील, तर ते काढून टाका आणि आगामी ग्रामपंचायतीपासून पुढील सर्व निवडणुकांसाठी कामाला लागा, असा कानमंत्र केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी (ता. १२) कार्यकर्त्यांना दिला. भाजप ग्रामीण जिल्हा शाखेतर्फे मधुरा लॉन्समध्ये सेवा सप्ताह व दीनदयाळ उपाध्याय जयंती पूर्वतयारीनिमित्ताने बैठक घेण्यात आली. त्यावेळी दानवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

आमदार हरिभाऊ बागडे, इद्रिस मुलतानी, भाऊराव देशमुख, नामदेव गाडेकर, शिरीष बोराळकर, प्रवीण घुगे, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, लक्ष्मण औटे, डॉ. दिनेश परदेशी, सांडू पाटील लोखंडे, सुरेश बनकर, रेखा कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थित होती. केंद्रीय दानवे यांनी विविध ठिकाणी शाखा उभारा, सामाजातील सर्वस्तरातील लोकांना त्यात सामावून घ्या त्यांना प्रतिनिधित्व द्या.

शासनाने कान उपटताच प्रशासकांना जाग, औरंगाबाद महापालिकेत ३० अधिकाऱ्यांना पदोन्नती

निवडणुकीत त्या-त्या समाजाचे मत मिळण्यास मदत होते, असा कानमंत्र दिला. पदवीधर निवडणुकीत पक्ष जो देईल तो उमेदवार असेल, असे सांगत त्यांनी एक टीम म्हणून ग्रामपंचायत, पदवीधरसह आगामी सर्व निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. ‘पदाधिकारी झालो, म्हणजे मोठा झालो, असे समजू नका’, असा सल्लाही त्यांनी दिला. आमदार बागडे यांनी करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यास राज्यातील आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. हॉस्पिटलआहे पण सुविधा नाही, त्यामुळे रुग्ण मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला.


कार्यकर्ता हा भुईमुगासारखा हवा
पक्षात जो सर्वांना सोबत घेऊन चांगले काम करतो, त्यालाच चांगला कार्यकर्ता म्हणतात. त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता तसेच पदाधिकारी भुईमूग झाडासारखा असला पाहिजेत, कुठेही उपटला, तर खळखळ शेंगाच लागल्या पाहिजे, नुसताच गाजरासारखा एकटा नको, अशा खुमासदार शैलीत दानवे यांनी कार्यकर्त्यांना फटकारले.

Web Title: Settle Dispute Quarrel Raosaheb Danve Suggestion Party People

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BjpRaosaheb Danve
go to top