
सोयगाव : तालुक्यातील रुद्रेश्वर येथे पर्यटन, श्रावण सोमवारनिमित्त आलेल्या सिल्लोड तालुक्यातील सात पर्यटक वाहनासह वेताळवाडी नदीच्या पुरात अडकले होते. ही घटना सोमवारी (ता. १८) दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान घडली. या पर्यटकांना ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.