
छत्रपती संभाजीनगर : आठवडाभरापासून थंडीने कहर केला असून तापमानात दिवसेंदिवस घट होत आहे. हवेचा दाब वाढला, की थंडीला सुरूवात होते, त्यामुळे उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याला दक्षिणेची दिशा मिळाल्याने आपल्याकडे कडाक्याची थंडी पडत असल्याची माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.