esakal | दोन पोते कंडोम, सात महिला, तीन पुरुष अन् नंतर झाले असे...
sakal

बोलून बातमी शोधा

Sex Racket Exposed At Vadgaon Kolhati

वडगाव (कोल्हाटी) येथील अण्णा भाऊ साठे चौकाजवळ कुंटणखाना चालत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांना शनिवारी (ता. 15) मिळाली. त्या आधारे पोलिसांनी छापा टाकला.

दोन पोते कंडोम, सात महिला, तीन पुरुष अन् नंतर झाले असे...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाळूज (जि. औरंगाबाद) - वडगाव (कोल्हाटी) येथील एका कुंटणखान्यावर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. यात कुंटणखाना चालविणाऱ्या महिला, सहा वारांगणा आणि तीन ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख 5 हजार 910 रुपये आणि दोन पोते कंडोम जप्त करण्यात आले. ही कारवाई शनिवारी (ता. 15) सायंकाळी पाचच्या सुमारास करण्यात आली. 

वडगाव (कोल्हाटी) येथील अण्णा भाऊ साठे चौकाजवळ कुंटणखाना चालत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांना शनिवारी (ता. 15) मिळाली. या माहितीवरून पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल चासकर, पोलिस हेडकॉन्स्टेबल वसंत शेळके, कयुम पठाण, वसंत जिवडे, रामदास गाडेकर, फकीरचंद फडे, प्रदीप कुटे, सतवंत सोहळे, बंडू गोरे, प्रकाश गायकवाड, मनमोहन कोलिमी, दीपक मतलबे, सुधीर सोनवणे, नवाब शेख यांनी शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास तेथे छापा टाकला. यावेळी तेथे कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह सात महिला आणि तीन ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

उद्यान नव्हे, नशेखोरांचे अड्डे! 

सिडको वाळूज महानगर येथील मध्यम उत्पन्न गटामधील नागरी वसाहतीतील उद्यानाचा वापर चिमुकल्यांना खेळण्यासाठी होण्याऐवजी ही उद्याने भकास झाली आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उद्यानात नशेखोर तरुण व रोडरोमिओंचा वावर वाढला आहे. त्यामुळे महिला व मुलींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. 

येथील सिडकोच्या मध्यम उत्पन्न गट डी सेक्‍टरमध्ये सिडकोने उद्यान उभारले आहे; मात्र या उद्यानाच्या सुरक्षा भिंतीची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. उद्यानात एकही झाड लावण्यात आले नसून मुलांच्या खेळण्याचे साहित्य उपलब्ध नाही. उद्यानामध्ये असलेले एमसीईबीचे ट्रान्स्फॉर्मर धोकादायक परिस्थितीमध्ये उभे असून नेहमीच या भागात विजेचा लपंडाव असतो. सुरक्षा भिंत नसल्याने या उद्यानाची अत्यंत दुरवस्था होऊन उद्यानाचे डंपिंग ग्राऊंड झाले आहे. त्यामुळे याकडे सिडकोने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

वाचून तर बघा : गोष्टीतला करकोचा आला सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात... 
 

loading image