Shalarth Scam: शालार्थ घोटाळा तपासाला चार महिन्यांची मुदतवाढ; विविध जिल्ह्यांतून नव्या तक्रारींमुळे प्रकरणाची व्याप्ती मोठी
Shalarth Scam Investigation: राज्यातील शालार्थ प्रणालीतील फसवणूक प्रकरणात एसआयटीला चौकशीसाठी चार महिन्यांची अतिरिक्त मुदतवाढ. अनेक जिल्ह्यांतून नव्या तक्रारींसह अपात्र कर्मचाऱ्यांना नियमबाह्य वेतनप्रकरणाची तपासणी अधिक व्यापक.
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शालार्थ प्रणालीत अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे नियमबाह्यरीत्या समाविष्ट करून त्यांना वेतन अदा केल्याच्या गंभीर प्रकरणाचा तपास आणखी चार महिने सुरू राहणार आहे.