Navratri Festival: यंदा तृतीया दोन वेळेस, तर नवरात्रोत्सव दहा दिवसांचा; १९९८ नंतर प्रथमच योग, अखंड नऊ दिवस उपवास
rare Navratri 2025 10 day festival after 27 years: यंदा शारदीय नवरात्रोत्सवात २७ वर्षांनी दुर्मीळ योग जुळला आहे. तृतीया तिथी दोनदा येत असल्याने नवरात्र १० दिवसांचे आहे. भक्तांसाठी हा उत्सव अत्यंत शुभ व फलदायी मानला जात आहे.
घाटनांद्रा (ता. सिल्लोड) : यंदा शारदीय नवरात्रोत्सव सोमवारपासून (ता. २२) ते ता. १ ऑक्टोबरपर्यंत आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात २७ वर्षांनंतर तृतीया तिथी ही दोनदा आल्याचा एक खास व दुर्लभ योग जुळून आला आहे.