

Shepherds and their sheep flocks arrive early in the Shendurwada area in search of fodder and water amid drought conditions.
esakal
शेंदूरवादा, : दुष्काळामुळे अहिल्यानगर व नाशिकसह पश्चिम महाराष्ट्रातील मेंढपाळांनी चारा-पाण्याच्या शोधात गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा परिसराकडे धाव घेतली आहे. दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीत दाखल होणारे मेंढ्यांचे कळप यंदा नोव्हेंबरमध्येच आल्याने स्थानिक पातळीवर पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.