'शिर्डी-औरंगाबाद अंतर कमी करण्यासाठी समृद्धी महामार्गाची मदत'

औरंगाबादहून शिर्डीकडे जाणाऱ्या वाहनांना माळीवाडा येथून वळवून ते कोकोमठाणपर्यंत जातील.
sunil chavan
sunil chavansunil chavan

औरंगाबाद: शिर्डी आणि औरंगाबादमधील प्रवासाचे अंतर कमी व्हावे यासाठी समृद्धी महामार्गाचा वापर करण्यात येणार आहे. माळीवाडा ते कोकमठाणपर्यंत समृद्धी महामार्गाचा वापर केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी (ता.३०) पत्रकार परिषदेत दिली. औरंगाबादहून मोठ्या प्रमाणात शिर्डी येथे भक्त संख्येने जातात. दोन मार्गाने शिर्डीला जावे लागते या मार्गांनी किमान दोन ते अडीच तास लगतात. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले की, समृद्धी महामार्ग नोव्हेंबरपासून सुरू करण्याबाबत पालकमंत्र्यांचे प्रयत्न आहेत. हा महामार्ग झाल्यानंतर शिर्डीला जाण्यासाठी ११७ किलोमीटरपर्यंत समृद्धी महामार्गाचा वापर केला जाणार आहे.

औरंगाबादहून शिर्डीकडे जाणाऱ्या वाहनांना माळीवाडा येथून वळवून ते कोकोमठाणपर्यंत जातील. कोकमठाण येथुन समृद्धी महामार्ग सोडून पुढे शिर्डीला वाहने जातील. कोकमठाण ते शिर्डी हे अंतर सहा किलोमीटरचे आहे. हा सहा किलोमीटरचा रस्ता एमएसआरडीसी करणार आहे. ही वाहतुक वळवली आणि कोकमठाण ते शिर्डी हा सहा किलोमीटरचा रस्ता झाला तर सवा ते दीड तासात शिर्डीला जाता येईल. अंतर आणि वेळ कमी झाल्याने शिर्डीकडे जाणारे भाविक, पर्यटक काहीकाळ औरंगाबादमध्ये थांबू शकतील यातुन पर्यटनाला चालना मिळेल असा विश्‍वासही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी व्यक्त केला.

sunil chavan
Osmanabad Corona: ग्रामीण स्तरावरच उपचाराची सुविधा; प्रशासनाची तयारी

औरंगाबाद - पुणे रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा-
औरंगाबादहून जर रेल्वेने पुण्याला जायचे असेल, माल पाठवायचा असेल तर १५३ किलोमीटर अंतर पार करावे लागते. जर औरंगाबाद - पुणे रेल्वेमार्ग झाला तर हेच अंतर ११४ किलोमीटर होईल. आज जर रेल्वेने पुण्याला जायचे झाले तर औरंगाबद ते मनमाड ११३ किलोमीटर तर पुढे मनमाड ते नगर- दौंड मार्गे पुणे हे १५३ किलोमीटर असे २६६ किलोमीटर जावे लागते जर औरंगाबाद - नगर - पुणे असा रेल्वे मार्ग झाला तर हेच अंतर १४ किलोमीटर होईल. यासाठी जिल्हाप्रशासन म्हणुन पाठपुरावा करत आहोत. असंही चव्हाण यांनी सांगितले.

sunil chavan
हिंगोली पंचायत समितीत कर्मचाऱ्यांच्या बदल्या

खासदार, रेल्वे राज्यमंत्री यांच्यापुढेही याचे सादरीकरण केले आहे. प्रशानाकडून तात्पुरत्या स्वरूपात या मार्गाच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबाद - पुणे हा रस्ता थ्रीटिअर करण्यात येईल असे म्हटले आहे यामुळे आमचा आणखी उत्साह वाढला आहे. औरंगाबाद - पुणे प्रवासाचे अंतर आणखी कमी होईल. तसेच औरंगाबाद - पुणे रेल्वे मार्गासाठी आणखी बरेच नियोजन बाकी आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करायची आहे. पुण्याला प्रवासी वाहतुक किती आहे, पुण्याला मालवाहतुक किती आहे असा बराच डेटा गोळा करायचा आहे. या मार्गासाठी उद्योजकांशीही चर्चा केली असून त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com