हिंगोली पंचायत समितीत कर्मचाऱ्यांच्या बदल्या

हिंगोली जिल्हा परिषद
हिंगोली जिल्हा परिषद

हिंगोली : पंचायत समितीमधील (Hingoli Panchayat Samiti) ज्या कर्मचाऱ्यांची सेवा चार वर्षे पूर्ण झाली अशा १२ कर्मचाऱ्यांच्या १० टक्के प्रशासकीय, तर ५ टक्के विनंतीवरून या धोरणानुसार गुरुवारी (ता.२९) समुपदेशन पद्धतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. शासनाने जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय, विनंतीवरून बदल्या करण्यासाठी ता.३१ जुलै अखेर तारीख दिली होती. त्यानुसार बुधवारी जिल्हा परिषदेच्या (Hingoli Zilla Parishad) विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशन पद्धतीने पार पडल्या. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राधाबिनोद शर्मा (IAS Radhabinod Sharma), अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या सभापती संजीवनी दीपके, उपसभापती ज्ञानबा कवडे, गटविकास अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे या समितीने गुरुवारी पंचायत समितीच्या सभागृहात बदली प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील १११ ग्रामपंचायती पैकी केवळ वादग्रस्त गावातील ग्रामसेवक यांच्या तक्रारी जीपकडे आल्यानंतर त्याच गावातील ग्रामसेवक यांचा विचार करण्यात आला.(staffs transfer in hingoli panchayat samiti glp88)

हिंगोली जिल्हा परिषद
दारु पिऊन तर्राट झालेल्या तरुणीने घातला बसस्थानकात धिंगाणा

यात सहा ग्रामसेवकांच्या प्रशासकीय कारणावरून बदल्या झाल्या. यामध्ये वडद, देवठाणा येथील ग्रामसेवक रवी पाटील यांची आडगाव येथे उचलबांगडी करण्यात आली, तर लाशीना येथील ग्रामसेवक श्रीखंडे यांची खानापूर, अंभेरी या गावाचा पदभार देण्यात आला. आडगाव येथील पी.एस.सासवडे यांच्याकडे रिक्त झालेल्या वडद, देवठाणा येथील पदभार सोपविण्यात आला. तर जे. व्ही. खंडारे यांची संभाव्य प्रशासकिय बदलीने रिक्त झालेल्या आडगाव येथे बदली झाली. गजानन जाधव यांच्याकडील नवलगव्हाण गावाचा अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आला. या शिवाय दोन परिचारिका, एक औषध निर्माण अधिकारी, एक पशुधन पर्यवेक्षक, एक परिचर, एक लिपिक असे मिळून बारा कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. बदली प्रक्रियेदरम्यान उपविभागीय अभियंता लव्हेश तांबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, प.स.सदस्य बालाजी गावंडे, तालुका पशुधन अधिकारी डॉ. इंगोले, गटशिक्षणाधिकारी बी. यू. कळूसे ,सहाय्यक गटविकास अधिकारी गणेश बोतीकर , सहाय्यक प्रशासन अधिकारी धनंजय पांडे, विस्तार अधिकारी विष्णू भोजे आदींची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com