Sanjay Shirsat: राज ठाकरे यांचे भाषण लोकांना भावले : संजय शिरसाट
Raj Thakre Uddhav Thakre: राज आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित सभा झाली, मात्र ती युती नव्हती, असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले. राज ठाकरेंचे भाषण संयमी होते, पण उद्धव ठाकरेंनी नेहमीप्रमाणे टोमणेच मारले, अशी टीकाही त्यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर : ‘आजचा जो मेळावा झाला, चांगला झाला. महाराष्ट्राने पाहिला. दोन्ही भाऊ एकत्र आले. पण, सर्वांची नजर राज ठाकरेंच्या भाषणावर होती. राज ठाकरे यांनी संयमी, मुद्देसूद भाषण केले.