Scholarship Exam : शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्जासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

Maharashtra Scholarship Exam 2026: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत येत्या २६ एप्रिलला होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज नियमित शुल्कासह १३ फेब्रुवारीपर्यंत भरता येणार आहेत. विलंब शुल्कासह व अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.
Scholarship Exam

Scholarship Exam

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या २६ एप्रिल रोजी ही परीक्षा होणार असून शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज नियमित शुल्कासह ता. १३ फेब्रुवारीपर्यंत स्वीकारले जाणार आहेत. याबाबत परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी माहिती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com