
औरंगाबाद दुध संघावर शिवसेना-भाजपचा झेंडा, सत्तार अन् बागडेंच्या गटाचा विजय
औरंगाबाद : राज्यात शिवसेना व भाजप भले एकमेकांवर टीका करित असतील. मात्र औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघावर युतीचा झेंडा फडकला आहे. यात महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार व माजी विधानसभा अध्यक्ष तथा भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांच्या गटाने विजय मिळविला आहे. त्यांनी १४ च्या १४ जागा जिंकल्या. येथे अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शिवसेना व भाजपची युती घडवून आणली आहे. औरंगाबाद तालुका मतदारसंघातून हरिभाऊ बागडे यांच्याविरुद्ध काँग्रेस पक्षाचे (Congress Party) सुरेश पठाडे यांचा अर्ज कायम राहिल्याने (Aurangabad) ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. यात अखेर बागडे यांनी बाजी मारली आहे. दुध संघाची वार्षिक उलाढाल १२० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. (Shiv Sena-BJP Win Aurangabad District Milk Producing Federation Election, Abdul Sattar And Haribhau Bagade Victory)
हेही वाचा: सहकारात या! जरुर आशीर्वाद देऊ, हरिभाऊ बागडेंचा कल्याण काळेंना टोला
संघाच्या निवडणुकीसाठी जवळपास १०० जणांनी अर्ज दाखल केले होते. छाननीत ७४ अर्ज वैध ठरले होते. यापूर्वी सात जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. उरलेल्या सात जागांसाठी शनिवारी (ता.२२) निवडणूक झाली. त्याचा आज रविवारी (ता.२३) निकाल जाहीर झाला आहे. दुसरीकडेआज काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार कल्याण काळे हे सत्कार प्रसंगी उपस्थित होते. (Aurangabad District Milk Producing Federation Election 2022)
हेही वाचा: उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण
सात विजयी उमेदवार व त्यांना मिळालेले मते
१. हरिभाऊ बागडे - २७४
२. गोकुळसिंग राजपूत - २६९
३. संदीप बोरसे - ३३०
४. कचरु डिके - २८६
५. अलका पाटील डोणगावकर - २८३
६. शिलाबाई कोळगे - २७३
६. पुंडलिकराव काजे - २५०
Web Title: Shiv Sena Bjp Win Aurangabad District Milk Producing Federation Election Abdul Sattar And Haribhau Bagade Victory
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..