esakal | शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंना कोरोनाची लागण, उपचारासाठी दवाखान्यात दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

1khaire_4

औरंगाबादचे माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना कोरोनाचा लागण झाली आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंना कोरोनाची लागण, उपचारासाठी दवाखान्यात दाखल

sakal_logo
By
ई सकाळ टीम

औरंगाबाद : औरंगाबादचे माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना कोरोनाचा लागण झाली आहे. याबाबत स्वतः खैरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बुधवारी (ता.नऊ) माहिती दिली आहे. त्यांना येथील सिग्मा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

खैरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे, की माझी आज कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करुन घ्यावी. माझी प्रकृती ठिक असून खबरदारीचा उपाय म्हणून सिग्मा हॉस्पिटल, संभाजीनगर येथे दाखल झालो आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. रविवारी (ता.पाच) बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्ह्यातील गोळवाडा येथे आले होते. त्यावेळी खैरे उपस्थित होते.  

संपादन - गणेश पिटेकर

loading image