

क्रांती चौक : बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सोमवारी क्रांती चौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी बांगलादेशाचा ध्वज पायदळी तुडवीत जाळण्यात आला. ‘बांगलादेशी हिंदू के सन्मान में... शिवसेना मैदान में’ अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.