छत्रपती संभाजीनगर : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या एका प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद महाविद्यालयात (Vivekananda College) बनावट प्रवेश घेत शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) बनावट पदव्या तयार करून एकाने खुलताबादच्या कोहिनूर कनिष्ठ महाविद्यालयात पूर्णवेळ सहशिक्षक पद मिळविले.