Chhatrapati Sambhajinagar: शिवाजीनगर भुयारी मार्गामध्ये पुन्हा अडकला टेंपो;पाच दिवसांत दुसरी घटना, रणरणत्या उन्हात वाहनांच्या लांब रांगा; प्रवासी झाले घामाघूम

Tempo Stuck Again on Shivajinagar Tunnel Road: शिवाजीनगर भुयारी मार्गावर पाच दिवसांत दुसरी वेळ टेंपो अडकली. रणरणत्या उन्हात वाहनधारक घामाघूम; नागरिक, प्रवासी व व्यापारी वयोवृद्ध, महिला व लहान मुले सुद्धा त्रस्त.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

शिवाजीनगर: छत्रपती शिवाजीनगर भुयारी मार्गात बुधवारी (ता. सहा) एकाच दिवशी दिवसभरात हायवा, बस, टेंपो, आयशर ट्रक अशी चार जड वाहने अडकली होती. ज्यामुळे आठ तास वाहतूक ठप्प झाली होती. पाच दिवसांनंतर म्हणजेच रविवारी (ता. दहा) पुन्हा अशीच घटना घडली. दुपारी साडेबारा वाजता भुयारी मार्गाच्या तोंडावरच लावलेल्या खांबाच्या लोखंडी चौकटीत टेंपो (एमएच २२ एए ३४४१) अडकल्याने वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहनाच्या रांगा लागल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com