
जायकवाडी : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती पैठणमार्फत तेलवाडी येथील शिवगंगा महिला बचत गटाला ट्रॅक्टर देण्यात आला. ट्रॅक्टरच्या माध्यमातून महिलांच्या शेती व्यवसायाला गती मिळणार असून, बचत गटाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल होणार आहे. ट्रॅक्टरचे लोकार्पण आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते झाले.