
छत्रपती संभाजीनगर : बनावट साक्षीदार उभे करत उद्योजकाची करोडी परिसरातील एक एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना २०२१ ते २०२५ दरम्यान घडला. याप्रकरणी १४ जुलैला तिघांविरुद्ध सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. शंकर राजू गोमलाडू, गोपाल राजू गोमलाडू आणि गोरख बंडूसिंग राजपूत अशी आरोपींची नावे आहेत.