Chh. Sambhajinagar Crime : शेतवस्तीवर पुरलेला मृतदेह काढला बाहेर! तरुणीचा गळा आवळून हत्या केल्यानंतर प्रकार
Crime Investigation : जालन्यातील लासूर स्टेशन येथील शेतात मोनिका सुमित निर्मळ हिचा गळा आवळून खून करून तीला पुरलेले आढळले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला, मात्र खुनाचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पती, सासू, सासऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
गंगापूर : जालन्यातील मोनिका सुमित निर्मळ (वय ३०) हिचा गळा आवळून खून करून शेतातील घरात खड्डा करून त्यात पुरल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील लासूर स्टेशन येथे शुक्रवारी (ता. १४) उघडकीस आली.