बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा

बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा
Published on
खामसवाडी (ता. कळंब) ः सिद्धिविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याच्या गळीत हंगामासाठी बॉयलर अग्निप्रदीपन करताना मीना कुलकर्णी. यावेळी दत्ता कुलकर्णी, बालाजी कोरे, दिनेश कुलकर्णी आदी. OSM26B07039 -------------- ‘सिद्धिविनायक’चा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा धाराशिव, ता. १९ (बातमीदार) ः आगामी गळित हंगामासाठी खासमवाडी (ता. कळंब) येथील श्री सिद्धिविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रिज लिमिटेड या कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा शनिवारी (ता. १९) विधिवत धार्मिक वातावरणात पार पडला. श्री सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक दत्ता कुलकर्णी यांच्या मातोश्री मीना कुलकर्णी यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले. यावेळी आगामी गळीत हंगामासाठी कारखान्याची तयारी, यंत्रसामग्रीची सज्जता, तांत्रिक व्यवस्था आणि विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. हंगाम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली असून, नियोजनबद्ध पद्धतीने गळीत हंगाम राबविण्यासाठी कारखाना प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात आले. ऊस उत्पादक शेतकरी हा कारखान्याच्या वाटचालीतील केंद्रबिंदू असून, शेतकऱ्यांचा विश्वास, कामगारांचे परिश्रम आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचे योगदान यांच्या बळावर आगामी हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. २०२६-२७ च्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगली सेवा देतानाच कारखान्याचे कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे दत्ता कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले. यावेळी बालाजी कोरे, दिनेश कुलकर्णी, गणेश कामटे, प्रतीक देवळे, मंगेश कुलकर्णी, प्रथमेश आवटे, अभयसिंह शिंदे, बालाजी जमाले, विकास उबाळे तसेच कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
Marathi News Esakal
www.esakal.com