

Chhatrapati Sambhajinagar
esakal
सिल्लोड: तालुक्यातील शेतशिवारात महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळे अक्षरशः मृत्यूचे सापळे तयार झाले आहेत. अनेक ठिकाणी जीवघेण्या स्थितीत असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारा चक्क जमिनीवर लोंबकळत आहेत. वर्षानुवर्षे या तारांची दुरुस्ती न झाल्याने आता शेतात काम करताना शेतकऱ्यांचे हात या तारांना सहज पोचत आहेत.