

illegal Sand Mining
sakal
सिल्लोड : तालुक्याची जीवनदायिनी असलेल्या पूर्णा नदीपात्रात वाळूमाफियांनी धुडगूस घालून नदीपात्राची अक्षरशः चाळणी करणे सुरू केले आहे. नदीपात्रात वाळूमाफियांच्या झुंडी ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाळूचा वारेमाप उपसा करत असताना, महसूल आणि पोलिस प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसले आहे.