Chhatrapati Sambhajinagar: एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या; वरिष्ठांकडून छळ ; सिल्लोडच्या आगारप्रमुखासह तिघांवर गुन्हे नोंद

Allegations of Harassment by Senior Officials: सिल्लोडमध्ये एसटी कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप असून तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar

esakal

Updated on

सिल्लोड: येथील राज्य परिवहन (एसटी) आगारातील सहायक वाहतूक नियंत्रक शरद विठ्ठल भिवसने (वय ४०, रा. वैशालीनगर, सिल्लोड) यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून बुधवारी (ता. आठ) दुपारी विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे एसटी विभागात मोठी खळबळ उडाली असून, याप्रकरणी सिल्लोड पोलिसांनी रात्री उशिरा आगारप्रमुख विजय काळवणे, एटीआय किरण अवसरमल आणि विकास चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com