

Chhatrapati Sambhajinagar
esakal
सिल्लोड: सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांत पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. चिंचवण गावच्या परिस्थितीबाबत दैनिक ‘सकाळ’मध्ये ग्राउंड रिपोर्ट प्रकाशित होताच इतर टंचाईग्रस्त गावांतील नागरिकांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचे शहरात सोमवारी (ता. १३) आयोजित आढावा बैठकीत पाहायला मिळाले. यावर पाण्यासह इतर मूलभूत समस्या सोडविण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी घरकुल, पाणंद रस्ते आणि पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून नागरिकांनी प्रशासकीय ढिसाळपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. सत्तार यांच्या विविध प्रश्नांवर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही.