Marathwada Rain: चार दिवसांत सहा मृत्यू; २०५ जनावरे दगावली, मराठवाड्यात तीन लाख हेक्टर शेतीचे नुकसान, पंचनामे करण्याची सूचना
Crop Damage: मराठवाड्यातील गेल्या चार दिवसांत मुसळधार पावसामुळे सहा जणांचा मृत्यू झाला, तर २०५ जनावरे दगावली. सुमारे तीन लाख हेक्टर शेती नुकसान झाली असून, १२१४ गावे बाधित झाली आहेत.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात गेल्या चार दिवसांत झालेला पाऊस व घटनांत सहा जणांचा मृत्यू झाला, तर २०५ जनावरे दगावली आहेत. सुमारे दोन लाख ८० हजार ६१ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. १२१४ गावे बाधित झाली आहेत.