
Abdul Sattar : दुष्टचक्र थांबेना! कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघात आठवड्यात तिसऱ्या शेतकरी आत्महत्या
छत्रपती संभाजीनगर : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात एका आठवड्यात तिसरी तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील साहव्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील शेतकऱ्याने विहीरीमध्ये उडी घेत आत्महत्या केली आहे. सुरज शेगवण असं या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेगवण यांची पळसखेडा परिसरात पाच एकर शेती आहे. शेतीसाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतलं होतं. सततची नापिकी आणि कर्ज कसे फेडणार या विवंचनेतून अखेर त्यांनी टोकाचं पाऊल उचललं.
अवकाळी पावसाने झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी सरकारकडून मदतीची घोषणा केली जात आहे. मात्र ती मदत शेतकऱ्यांपर्यंत किती प्रमाणात पोहचत आहे. यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
गेल्या सात दिवसाता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या सात दिवसात सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक आत्महत्या या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात झाल्या आहेत. याबद्दल आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.