Bidkin Accident: बुधवारी बिडकीनमध्ये जीप-कार अपघात, सहा जण गंभीर जखमी, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान
Accident News: बीडकिंजवळ औद्योगिक वसाहतीजवळ जीप आणि कारची समोरासमोर धडक होऊन सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले.
बिडकीन (ता. पैठण) : येथील औद्योगिक वसाहतीजवळील चौफुलीवर भरधाव जीप व कारची समोरासमोर धडक झाली. बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात एकूण सहा जण गंभीर जखमी झाले. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.