Family members paying tribute to the young organ donor who saved six lives.
sakal
छत्रपती संभाजीनगर
Organ Donation: तरुणानं अवयवदान करुन सहा जणांना दिलं जीवनदान! किडनी, फुफ्फुस, डोळे, लिव्हर दान करून कुटुंबीयांनी दाखविलं दातृत्व..
Organ Donation Awareness India: धनंजयच्या अवयवदानाने सहा जणांना मिळाले नवजीवन, कुटुंबीयांनी दाखवले माणुसकीचे दर्शन
जालना: एका अपघाताने आयुष्याचा प्रवास अचानक थांबविला, पण माणुसकीची वाट अखेरपर्यंत उजळत राहिली. मृत्यूच्या दारात निपचित पडलेल्या धनंजय काळे या तरुणाने जाता जाता अवयव दानाच्या रूपाने सहा जणांच्या आयुष्यात नवे पर्व आणले. देह नश्वर असतो, पण त्यातून उमटलेली मानवतेची ज्योत मात्र चिरंतन असते, हेच धनंजय याच्या कुटुंबाने आपल्या ‘लाडक्या’च्या अंतिम प्रवासाक्षणी दाखवून दिले.

