

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: शहरात रस्त्यावर, गल्लोगल्ली फिरून अनेक जण पाच-दहा रुपयांची मागणी करताना सर्रासपणे दिसतात. पण, आता हे चित्र बदलणार आहे. भिक्षा मागणाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र शासनाने 'स्माइल' योजना सुरू केली. त्यात दोनशे जणांचे पुनर्वसन केले जाणार असून, सर्वेक्षणात आढळून आलेल्या भिक्षेकरूंना व्यावसाय शिक्षण दिले जाणार आहे.