
छत्रपती संभाजीनगर : सामाजिक न्याय खात्याला पैशाची आवश्यकता नसेल किंवा खात्याची गरज नसेल तर खाते बंद करा’, अशा शब्दांत उद्विग्नता सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. ‘अर्थ खाते मनमानी करत असून, हा सर्व प्रकार चुकीचा आहे. अन्याय म्हणा किंवा का निधी कट केला मला माहीत नाही. मात्र, याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. या खात्याचा निधी वर्ग किंवा कापता येत नाही. अर्थ खात्यातील त्या ‘शकुनी’, ‘महाभाग’ ‘हुशारां’नी कोणत्या नियमाने हे केले ते दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.