Solar Agriculture Pump: सौर कृषिपंप योजनेत महाराष्ट्राने गाठला उच्चांक; गिनीज बुक विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा शुक्रवारी
Maharashtra Sets Global Record with Solar Agriculture Pumps: महाराष्ट्राने ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत एका महिन्यात ४५,९११ सौर कृषिपंप बसवून जागतिक विक्रम गाठला. गिनिज बुक प्रमाणपत्र प्रदान सोहळा शुक्रवारी शेंद्रा एमआयडीसीमध्ये होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला. महावितरणने एकाच महिन्यात ४५,९११ सौर कृषिपंप लावण्याचा जागतिक उच्चांक गाठला. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये यशस्वी नोंद झाली.