Sanjay Shirsat: छत्रपती संभाजीनगरमध्ये प्लॉटच्या वादातून मुलाचा मृत्यू झाला आणि कुटुंबीयांना धमक्या देण्यात आल्या. स्थानिकांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली.
छत्रपती संभाजीनगर : प्लॉटच्या वादातून अख्ख्या कुटुंबावर हल्ला झाला. त्यात एकुलता एक मुलगा प्रमोद पाडसवान याचा मृत्यू झाला. यानंतरही या घटनेत आमचे नाव का घेतले म्हणून विष्णू गव्हाड या व्यक्तीने प्रमोदच्या काकूला धक्काबुक्की करत कानशिलात लगावली.