सोयाबीन काढण्याच्या कारणावरून शेतात राडा

सोयाबीन काढण्याच्या कारणावरून शेतात राडा
Published on: 
सोयाबीन काढण्याच्या कारणावरून शेतात राडा -- लोखंडी रॉड व काठीने मारहाण; १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल -- उदगीर, ता. ९ (बातमीदार) : शेतातील सोयाबीन काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शेतकऱ्याला लोखंडी रॉड व लाकडी काठीने मारहाण केल्याची घटना गंगापूर शिवारात घडली. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीरभद्र त्र्यंबक बिरकुले (वय ५५, व्यवसाय शेती, रा. गंगापूर, ता. उदगीर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. बुधवारी (ता. सात) सकाळी नऊच्या सुमारास गंगापूर शिवारातील गट क्रमांक १०३ मधील शेतात हा प्रकार घडला. सोयाबीन काढणीवरून आरोपी कचरू रामा गायकवाड, मंडोदरी कचरू गायकवाड, ज्योतिर्लिंग कचरू गायकवाड, गंगाबाई ज्योतिर्लिंग गायकवाड, तानाजी कचरू गायकवाड, संध्या हंसराज माळवाडे, जयश्री गुरुनाथ माळवाडे, सुरेश गुरुनाथ माळवाडे, तानाजी गायकवाड, प्रकाश हंसराज माळवाडे, सागर सुरेश माळवाडे, ओमप्रकाश सदाशिव पटवारी, ललिता ओमप्रकाश पटवारी, गणेश ओमप्रकाश पटवारी, अश्विनी गणेश पटवारी यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीस शिवीगाळ केली. त्यानंतर संगनमत करून बेकायदेशीर जमाव जमविला. यावेळी एका आरोपीने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या मानेवर वार करून त्यांना जखमी केले. तसेच अन्य आरोपींनी काठीने, तर आणखी एका आरोपीने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे व पुन्हा शेतात आल्यास ठार मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com