
सोयगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) : राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) सोयगाव-धुळे बस आणि टेंपोच्या धडकेत टेंपोचालकाचा जागीच मृत्यू झाला तर बसचालक, वाहकासह ४२ प्रवासी जखमी झाले. पारोळा-भडगाव (जि. जळगाव) मार्गावरील वाघरे फाट्याजवळ बुधवारी (ता. २०) दुपारी ही घटना घडली.