Chhatrapati Sambhajinagar: खोल खोल पाणी प्रशासनाला दिसेना;विहीर अधिग्रहण, टँकरचे ३८ गावांचे प्रस्ताव रखडले; कागदी घोळ सुरूच
Soygaon Taluka Faces Severe Water Shortage: सोयगाव तालुक्यात ३८ गावांना गंभीर पाणीटंचाई असताना विहीर अधिग्रहण व टँकर प्रस्ताव अद्याप प्रशासनाकडे धूळ खात आहेत. तीन गावांनाच चार विहिरी मंजूर, इतर प्रस्ताव ठप्प.
सोयगाव: सोयगाव शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस पाणीटंचाई उग्र रूप घेत असून, प्रत्यक्षात ३८ गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली असताना कागदावर मात्र तीन गावांत चार विहिरी अधिग्रहित झाल्याचे चित्र आहे.