

uddhav thackeray
sakal
छत्रपती संभाजीनगर : ‘‘राज्यात भाजपची सत्ता आणि पैशाची मस्ती सुरू आहे. पण, ही मस्ती दाखवाल तर ज्याप्रमाणे बांगलादेशात लोक रस्त्यावर उतरले आहेत, तशी महाराष्ट्रातील जनता तुमच्याविरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,’’ असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. विकासकामांवर बोला, दोन हजार देतो म्हणणाऱ्या फडणवीसांनी हिंदू-मुसलमान वादाशिवाय भाषण करून दाखवावे, मी एक लाख रुपये देतो, असे आव्हानही त्यांनी दिले.