

Latur Crime
sakal
लातूर: येथील जवाहर नवोदय विद्यालयातील मुलीच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करण्यासाठी शासनाने आता विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापन केली आहे. भोकरच्या अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील पथकाच्या प्रमुख असतील. पथकात काही स्थानिक अधिकाऱ्यांचा समावेश असेल. तपास करून पथक अहवाल शासनास सादर करील.