चिकलठाणा : भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराचे विमानतळासमोरच्या गतिरोधकावर नियंत्रण सुटले. अन्य दुचाकीला धडकून तो खाली कोसळला. यात पोलिस व्हॅनखाली येऊन त्याचा मृत्यू झाला. विष्णू काशिनाथ खर्जुले (वय २६, रा. करमाड) असे मृताचे नाव आहे. .याप्रकरणी पोलिस अंमलदार समाधान आनंदा उबाळे (वय ५६) यांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा आशय असा ः चिकलठाण्यात शॉक लागून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, अंमलदार उबाळे आणि चालक आर.बी. सांगळे हे व्हॅनने घटनास्थळाकडे जात होते..विमानतळासमोर येताच मागून खर्जुले हा दुचाकीने (एमएच-२०, एफडी-०१५१) आला. त्याच्या दुचाकीचा वेग जास्त होता. त्यामुळे विमानतळासमोरील गतिरोधकावर त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि बाजूच्या दुचाकीस्वाराचा धक्का लागून तो खाली पडला..Pune News : ग्रामपंचायतीच्या नोंदीत बनावट कारभार उघड; माजी सरपंच व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल.दुचाकी बाजूला घसरत गेली. खाली पडलेला खर्जुले हा अचानक पोलिसांच्या व्हॅनखाली (एमएच-२०, एचबी-९३२१) आला. यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो ठार झाला. अधिक तपास हवालदार सतीश जोगस करीत आहेत...सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.