Chh.Sambhajinagar: फुलंब्रीत बसचालकाच्या सतर्कतेमुळे ५७ प्रवासी बचावले
Accident News: फुलंब्री परिसरात समोरून चुकीच्या मार्गाने आलेल्या कारमुळे एसटी बसचालकाने हुशारीने नियंत्रण मिळवून अपघात टाळला. ५७ प्रवासी सुरक्षित राहिले.
फुलंब्री : छत्रपती संभाजीनगर येथून सिल्लोडकडे ५७ प्रवासी घेऊन जाणाऱ्या एसटी बससमोर अचानक चुकीच्या पद्धतीने कार आली. अपघात टाळण्यासाठी बसचालकाने बसवर कौशल्यपूर्ण नियंत्रण मिळविले.