esakal | वैजापूर तालुक्यात एसटी-दुचाकीचा भीषण अपघात, तिघे ठार | Aurangabad Accident News
sakal

बोलून बातमी शोधा

मनूर (जि.औरंगाबाद) : वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील नाशिक- औरंगाबाद महामार्गावरील  पेट्रोलपंपाजवळ एसटी बस  व दुचाकीचा अपघात होऊन तीन जण ठार झाले. अपघातग्रस्त एसटी.

वैजापूर तालुक्यात एसटी-दुचाकीचा भीषण अपघात, तिघे ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मनूर (जि.औरंगाबाद) : वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील नाशिक औरंगाबाद महामार्गावर अजित पेट्रोलपंपाजवळ एसटी बस व दुचाकीचा अपघात होऊन तीन जण ठार झाल्याची घटना मंगळवारी (ता.पाच) सायंकाळी घडली. औरंगाबाद - नाशिक बस (एम एच 14 बीटी 3344) ही खंडाळाकडुन वैजापूरकडे (Vaijapur) जात होती. तर दुचाकीवरुन (एमएच 20 एफएन 4172) तीन जण वैजापूरकडुन शिऊरकडे जात असताना झालेल्या अपघात दुचाकीवरील तीन जण ठार झाले आहेत. अमोल भाऊसाहेब ठुबे (वय 23, रा.पोखरी, ता.वैजापूर), सोमनाथ साहेबराव निकम (वय 32, रा.शिऊर, ता.वैजापूर), कडुबा ज्ञानेश्वर ठुबे (22, रा.पोखरी, ता.वैजापूर) हे जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असुन बस रस्त्याच्या कडेला असलेल्या (Accident In Aurangabad) नालीत गेली.

हेही वाचा: Skoda Auto ची भारतात ही कार दाखल, किंमत ११.९९ लाखांपासून सुरु

मात्र यात प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. येथे जमलेल्या नागरिकांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले व मृतांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. वैजापूर पोलिस ठाण्याचे बीट जमादार रज्जाक शेख, योगेश वाघमोडे, यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

loading image
go to top