esakal | Skoda Auto ची भारतात ही कार दाखल, किंमत ११.९९ लाखांपासून सुरु| Skoda Auto
sakal

बोलून बातमी शोधा

स्कोडा रॅपिड मॅट

Skoda Auto ची भारतात ही कार दाखल, किंमत ११.९९ लाखांपासून सुरु

sakal_logo
By
टीम ई सकाळ

स्कोडा कंपनीने सोमवारी भारतीय बाजारात आपल्या मध्यम आकाराची सेदान रॅपिड कार सादर केली. तिची किंमत ११.९९ लाख रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरु होते. स्कोडा ऑटो इंडियाने म्हटले आहे, की रॅपिड मॅट, कार्बन स्टील मॅट रंगात उपलब्ध होईल. मॅन्युअल ट्रान्समिशन एडिशनची किंमत ११.९९ लाख रुपये आहे. दुसरीकडे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन एडिशनची किंमत १३.४९ लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड निर्देशक जॅक हाॅलिस यांनी म्हटले आहे, की २०११ मध्ये सादर केल्यानंतर एक लाखांपेक्षा अधिक ग्राहकांबरोबर रॅपिड भारतात यशस्वी ठरली आहे. देशभरातील कार प्रेमींना ती खूपच आवडली आहे. ते म्हणाले, की ही यशोगाथा पुढे नेत कंपनीला भारतात रॅपिड मॅट एडिशन सादर करताना आनंद होत आहे. कार आणि बाईक विश्वाचे वार्तांकन करणाऱ्या ऑटो वेबसाईट 'रशलेन' च्या वृत्तानुसार या कारच्या सुविधांमध्ये एकमेव मोठा रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आहे. इतर फिचर्स टाॅप- स्पेक मोंटे कार्लो ट्रिमप्रमाणे असेल. त्यात ८ इंच अँड्राईड टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिट, ऑटो क्लायमेट कंट्रोल, पाॅवर अॅडजस्टिंग आणि फोल्डिंग आरसा, ऑटो हेडलॅम्प आणि व्हायपर, प्रोजेक्टर लायटिंगसह एलईडी डीआरएल आणि एक के बरोबर पाॅवर विंडोही आहे.

हेही वाचा: 15 हजार रुपयांत खरेदी करु शकता 'हे' बेस्ट स्मार्टफोन, पाहा यादी

- कारमध्ये या व्यतिरिक्त चार एअरबॅग, रिअर पार्किंग सेन्सर, ईबीडीसह एबीएस, ईएससी आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरियंटमध्ये हिल-होल्ड फंक्शनद्वारा सुरक्षेचा विचार करण्यात आला आहे.

- ही कार एक लिटर ३ सिलेंडर टीएसआय टर्बो पेट्रोल इंजिनद्वार चालणारी असेल. जे १०९ बीएचपी आणि १७५ एनएमचे पीक टाॅर्क देते. या युनिटला ६ स्पीड मॅन्युअल किंवा ६ स्पीड टाॅर्क कर्न्व्हटर ऑटोमॅटिक गिअरबाॅक्स बरोबर जोडले गेले आहे.

- तसे पाहिल्यास स्कोडा एक नवीन सेदान लाॅन्च करण्याच्या तयारीत आहे. ती या वर्षाच्या शेवटी येऊ शकते. सद्यःस्थितीत स्कोडाचे भारतात चार माॅडल्स आहेत. त्यात न्यू कुशाक, रॅपिड १.० टीएसआय, न्यू ऑक्टाव्हिया आणि न्यू सुपर्ब आदींचा समावेश होतो.

loading image
go to top