निवडणुकीसाठी बायको हवी बॅनर लावणं अंगलट, चाकणकर म्हणाल्या...

Rupali Chakankar on Aurangabad Banner News
Rupali Chakankar on Aurangabad Banner Newssakal media

औरंगाबाद : निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे, अशा आशयाचे बॅनर शहरात तीन ठिकाणी लावण्यात आले. या बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. तसेच हे बॅनर सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले. त्यानंतर आता राज्य महिला आयोगानं (State Woman Commison) याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. (Aurangabad 'Bayko Hawi' Banner News)

Rupali Chakankar on Aurangabad Banner News
निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे, औरंगाबादेत बॅनरची चर्चा

निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे, असे जाहिरात फलक औरंगाबाद शहरात झळकले. याप्रकारची बातमी प्रसार माध्यमातून प्रसारित होत आहे. सदर फलक अतिशय गंभीर स्वरूपाचे व महिलांचा अवमान करणारी आहे. याप्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. तसेच औरंगाबाद शहराचे पोलिस आयुक्त यांना तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? -

रमेश विनायकराव पाटील यांनी औरंगाबाद शहरात तीन ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे, अशा आशयाचे बॅनर लावले. मला तीन मुले असल्याने मी निवडणूक लढवण्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसत नाही. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे. त्यासाठी कुठलीही जातीची अटक नाही. कुठल्याही जातीची महिला चालेल. वय वर्ष २५ ते ४० वयोगटातील अविवाहीत, विधवा किंवा घटस्फोटीत महिला चालेल. पण, त्यात एक अट ठेवण्यात आली आहे. या महिलांना दोनच अपत्य असावी. जास्त असेल तर त्या महिलांना स्वीकारण्यात येणार नाही, असं या बॅनरवर लिहिलं आहे. त्यानंतर आता महिला आयोगानं याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

औरंगाबाद शहरात लागलेले बॅनर
औरंगाबाद शहरात लागलेले बॅनरe sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com