
छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक विद्यार्थी आपल्या क्षेत्रात सक्षमपणे उभा राहावा, यासाठी शिक्षकांनी झोकून देत काम करावे, शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शिक्षकांची राज्यव्यापी आयडॉल बँक तयार करणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केले.