
औरंगाबाद : सावत्र मामाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
औरंगाबाद - उस्मानपुरा भागातील एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २५ ते २८ एप्रिल दरम्यान तिच्या सावत्र मामाने अत्याचार केला. पोलिसांनी तपास करून फरार झालेल्या सावत्र मामाला बुधवारी (ता. चार) मे रोजी रात्री अटक केली. त्याला ९ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. कुलकर्णी यांनी दिले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या वडिलांना चार बायका आहेत. पीडिता ही दुसऱ्या क्रमांकाच्या पत्नीची मुलगी आहे. ती पूर्वी जिन्सी भागात राहायची, परंतु चौथ्या क्रमांकाची पत्नी कुकरचा स्फोट होऊन जखमी झाल्याने काही दिवसांपासून पीडितेला मदतीसाठी उस्मानपुरा ठाण्याच्या हद्दीतील घरी आणले होते. पाच ते सहा दिवसांपूर्वी चौथ्या क्रमांकाच्या पत्नीचा भाऊ कामानिमित्त आला. तो तेथेच राहिला. त्याने २५ ते २८ एप्रिल दरम्यान, पीडितेवर तीनवेळा अत्याचार केले. हा प्रकार वाढत गेल्याने पीडितेने तिच्या सावत्र भावाला (पहिल्या आईच्या मुलाला) फोन करून कळविले. त्याने ही घटना चुलत्याला सांगितली. प्रकरणात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागूल यांनी युक्तिवाद केला.
Web Title: Step Unlce Raped On Minor Girl
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..