लेकीवर अत्याचार करणारा सावत्र पिता अटकेत

पिठाची गिरणी चालविण्यासाठी आईला बाहेर पाठवून देत पित्याचे दुष्कृत्य
Stepfather arrested For abused girl ayrangabad
Stepfather arrested For abused girl ayrangabadesakal
Updated on

औरंगाबाद - सावत्र पित्याने १६ वर्षीय अल्पवयीन लेकीवर तब्बल वर्षभर अत्याचार केल्याचा प्रकार शिवाजीनगर परिसरातील किरायाच्या घरात समोर आला. विशेष म्हणजे, पीडितेसह तिच्या आईला घराबाहेर पडण्याची मुभा नसल्याने अल्पवयीन पीडितेने हा किळसवाणा प्रकार वर्षभर सहन केला, त्यानंतर नुकतेच सदर परप्रांतीय कुटुंब स्वतःच्या घरात राहण्यासाठी गेल्यानंतर अखेर पीडितेने आईसह पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. त्यानंतर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक तथा तपास अधिकारी मीरा चव्हाण यांनी तत्काळ नराधम सावत्र पित्याला बेड्या ठोकल्या आहेत.

याप्रकरणी १६ वर्षीय अल्पवयीन पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती शिक्षित असून मूळची उत्तरप्रदेशातील लखनऊ येथील रहिवासी आहे. सध्या इंदिरानगर परिसरात आईवडील आणि चार लहान भावंडांसह राहते. तिच्यासोबत राहणारा बाप हा सावत्र असून ते शिवाजीनगरात पिठाची गिरणी चालवितात. घटनेदरम्यान पीडितेचे कुटुंब हे शिवाजीनगरातील मीरा ज्वेलर्स परिसरात राहत होते. सध्या त्यांच्या इंदिरानगरातील स्वतःच्या घरात राहतात.

सावत्र पित्याचा होता लेकीवर डोळा

विशेष म्हणजे घरात सर्वांत मोठी पीडिता आहे. तिचे वडील पिठाची गिरणी चालवून दुपारी जेवणासाठी घरी येत असत, त्यानंतर पीडितेच्या आईला गिरणीवर पाठवून देत असत. २०२१ मध्ये एक दिवस दुपारी नराधम पिता घरी आल्यानंतर त्यांनी पीडितेवर बळजबरी अत्याचार केला. ही बाब कोणाला सांगू नको म्हणत तिला जबर मारहाणही केली. त्यानंतर नराधमाचे हे कृत्य नेहमीचेच झाले होते. तसेच घराबाहेर जाऊ नको म्हणून ते पीडितेला शिवीगाळही करत असत. विशेष म्हणजे ही बाब आईला सांगू नको म्हणून मारहाण करत नेहमी धमकी देत असत. वेळोवेळी होणारे अत्याचार सहन न झाल्याने फेब्रुवारी २०२२ मध्ये पीडितेने ही गोष्ट आईला सांगितली. त्यावर आईने पीडितेला धीर देत पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचे आश्वासन दिले, परंतु आरोपी दोघींनाही घराबाहेर जाऊ देत नसे.

तसेच पीडितेची आईही नराधम पतीला घाबरत असल्याने दोघींना तक्रार देण्यासाठी धैर्य होत नव्हते. एक दिवस पीडितेची आई नराधमाला रागावत मुलीसोबत वाईट कृत्य का करता म्हणत जाब विचारला. त्यावर नराधमाने पिडितेसह तिच्या आईला गंभीर मारहाण केली. विशेष म्हणजे मे २०२२ मध्ये पीडितेचे कुटुंबीय त्यांच्या स्वतःच्या घरी राहण्यास गेल्यानंतरही तिचा बाप तिच्यावर अत्याचार करत होता, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

दोन दिवस पोलिस कोठडी

अखेर पीडितेने पोलिसांत धाव घेत तक्रार दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मीरा चव्हाण यांनी आरोपी नराधमाला तत्काळ अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत, अशी माहिती तपास अधिकारी मीरा चव्हाण यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com