esakal | शेअर मार्केट, म्युच्युअल फंड; गुंतवणुकीकडे वाढला ओढा!IStock markets
sakal

बोलून बातमी शोधा

share market sensex

शेअर मार्केट, म्युच्युअल फंड; गुंतवणुकीकडे वाढला ओढा!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना काळात सर्वांनी बचतीकडे विशेष लक्ष देणे सुरु केले आहे. हिच बचत भविष्याचा विचार करुन प्रत्येकजण करू लागला आहे. यामुळे गेल्या दीड ते दोन वर्षात केवळ गरजेच्या वस्तूंपुरताच खर्च केला जात आहे. अनेकजण भविष्याचा विचार करुन आपली जमापुंजी जपून ठेवत आहे. याच कeळात प्रॉपर्टी, सोने यातही गुंतवणूक वाढली. त्यापाठोपाठ शेअर मार्केट मधील गुंतवणुकीनेही जिल्ह्यात चांगलीच उसळी घेतली आहे. जिल्ह्यात शेअर मार्केटसह म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ५० टक्क्यांनी वाढल्याची माहिती शेअर मार्केटमध्ये काम करणारे अरुण पचेशिया यांनी दिली.

हेही वाचा: के.व्ही.सुब्रमण्यम मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा देणार राजीनामा

जिल्ह्यात शहराप्रमाणे ग्रामीण भागातील लोकही यात गुंतवणूक करीत आहेत. शेअर मार्केट प्रमाणेच बचतीसाठीचे वेगवेगळे बचत गटही स्थापन झाले आहेत. यात साधारण रोज ५० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत बचत गटात गुंतवणूक केली जात आहे. यातून दर महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. याच प्रमाणे शहर व जिल्ह्यात म्युच्युअल फंडात ५०० रुपये प्रति महिनाप्रमाणे गुंतवणूक करणारेही वाढले आहेत. शेअर मार्केट डी मॅट अकाऊंटच्या माध्यमातून गुंतवणुकदार वाढले आहेत. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यांमध्ये आता तरुणांचा सहभाग वाढू लागला आहे. महिन्याला येणाऱ्या कमाईतून दोन ते पाच टक्के रक्कम तरुणाई शेअर मार्केटमध्ये गुंतवत आहे. कधी नोकरी गेल्यास हीच बचत कामी येईल, हा उद्देश ठेऊन तरूणाई ही गुंतवणूक करीत आहे. एलआयसी यासह प्रॉपर्टी एवढेच नव्हे तर सोने खरेदीच्या तुलनेत ४० ते ५० टक्के गुंतवणूकदार शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात (एसआयपी) गुंतवत आहेत. यातील गुंतवणूक काही लोक ब्रोकरच्या माध्यमातून तर काही स्वत: या क्षेत्राचा अभ्यास करून करीत आहेत. यामुळे अर्थिक साक्षरता वाढू लागली असल्याचेही अरुण पचेशिया यांनी दिली.

loading image
go to top