सोयगाव : तालुक्यातील सोयगाव, बनोटी आणि जरंडी या तीन मंडळांमध्ये बुधवारी (ता. ११) रात्री आठच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने थैमान घातले. वाऱ्यामुळे विजेचे खांब, तारा कोसळल्या असून शहरातील वीजपुरवठा रात्रभर ठप्प झाला होता..सोयगाव-फर्दापूर रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. तालुक्यात सरासरी १८ मिमी पावसाची नोंद झाली असून, सावळदबारा मंडळ मात्र कोरडे राहिले. शिंदोल शिवारात वादळी वाऱ्यामुळे काढणीच्या तयारीत असलेल्या १८०० केळी पिकांची खोडे आडवी झाली. यात रवींद्र सोनवणे यांचे तीन लाखांचे नुकसान झाले. तर, ईश्वर पाटील ३०० आणि बापू बिरारी यांच्या ३०० खोडांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी सकाळी बाधित शेतकऱ्यांनी तलाठी संतोष राऊत यांना नुकसानीबाबत माहिती दिली असता ‘मी रजेवर आहे. स्वतःच फोटो काढून तहसीलला द्या’ असे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे..बळिराजाच्या आशा पल्लवितखुलताबाद : खरीप पेरणीसाठी महत्त्वाचे ठरणारे मृग नक्षत्र अखेर गुरुवारी सायंकाळनंतर बरसले. खुलताबाद शहर आणि परिसरात विजांच्या लखलखाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाने हजेरी लावली. यंदाच्या खरिपाची तयारी करण्यास बळिराजाला वेळच मिळाला नाही. मे महिन्यात पडलेल्या पावसानंतर प्रतीक्षा होती मृगाच्या पावसाची. गुरुवारी पाऊस झाल्याने बळिराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत..वैजापूर : तालुक्यात गुरुवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अर्धा तास मुसळधार पावसाने हजेरी लावली. लासूरगाव, फळजळगाव राहेगव्हाण, दहेगाव, जरूळ, बेळगाव, लाख खंडाळा, पाराळा, वडजी, नाराळा, नायगव्हाण या ठिकाणी वाऱ्यासह पाऊस झाल्याने घरावरील पत्रे उडाले. तसेच विद्युत तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता..दिवसभर वीजपुरवठा खंडितलाडसावंगी : परिसरातील सय्यदपूर, औरंगपूर, कांचनापूर, पिंपळखुटा, दरेगाव, मुरूमखेडा, भोगलवाडी, सेलूद, चारठा शिवारात बुधवारी आणि गुरुवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. मृग नक्षत्रात सलग दोन दिवस पाऊस पडल्याने पेरणी, कपाशी लागवडीस वेग येणार आहे; तसेच विजेचे खांब झुकले असून, जुनी झाडे उन्मळून पडली आहेत. पिंपळखुंटा, मुरूमखेडा, औरंगपूर गावांचा वीजपुरवठा दिवसभर खंडित होता..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.